युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचे विजेतेपदावर शिक्कामोर्तब
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या (मुख्यमंत्री चषक) पारितोषिक वितरण समारंभात वैयक्तिक आणि सांघिक गटातील विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. मुलींच्या गटात तामिळनाडूने, तर मुलांच्या गटात उत्तर प्रदेशने विजेतेपद पटकावले.
मुलींच्या गटात कर्नाटक संघाला उपविजेतेपद मिळाले. मुलांच्या गटात मध्य प्रदेश संघाने उपविजेतेपद मिळविले.
यावेळी जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या यशदीप भोगे याचाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
०००००
वृत्त
No comments:
Post a Comment