Thursday, 12 November 2026

मुंबईतील २९ हजार सफाई कामगारांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीला सुरुवात

 मुंबईतील २९ हजार सफाई कामगारांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीला सुरुवात

-विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

            मुंबईतील २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना घरे मिळवून देण्याच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात पंचशील नगरातील १४० सदनिकांच्या चावीवाटपाने झाली आहे. मुंबई स्वच्छ आणि निरोगी ठेवणाऱ्या सफाई कामगारांना सन्मानपूर्वक निवास देण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

 

पंचशील नगरातील दोन इमारतींमध्ये १४० सदनिका उभारण्यात आल्या असून, त्यामध्ये दहा लिफ्टसह आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वच्छ परिसर, मुलांसाठी अभ्यासाच्या सुविधा आणि विविध उपक्रमांसाठी अनुकूल वातावरण यामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबांच्या उज्ज्वल भवितव्याला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला फीत कापून सदनिकांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यानंतर सदनिकांची पाहणी करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi