Thursday, 5 November 2026

मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठीची मोटार वाहन चालक-वाहक प्रशिक्षण योजना

 मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठीची मोटार वाहन चालक-वाहक प्रशिक्षण योजना केवळ पुणे येथे केंद्रित न ठेवता जिल्हास्तरावर राबवावी. त्यासाठी ‘सारथी’ने जाहिरात प्रसिद्ध करून इच्छूक संस्थांकडून अर्ज मागवावेत, असेही मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

            इयत्ता 5वी ते 10 वी या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शालेय शिक्षण विभागामार्फत शिष्यवृत्ती योजना, परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्काव्यतिरिक्त प्रयोगशाळा शुल्क, ग्रंथालय शुल्क इत्यादी 16 बाबींची प्रतिपूर्ती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळण्यास पात्र असणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थीही पात्र ठरणार आहेत. त्यामुळे पालकांवरील शिक्षणाच्या खर्चाचा मोठा भार हलका होणार आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi