पर्यावरण रक्षणासह आर्थिक प्रगती शक्य; भारताने जगाला दिशा दाखविली
-प्रिन्स विल्यम
- अर्थशॉट प्राईझ इम्पॅक्ट असेम्ब्लीमध्ये भारतीय पर्यावरणपूरक उपक्रमांचे केले कौतुक
मुंबई, दि. १६ : पर्यावरणाचे रक्षण आणि आर्थिक विकास या परस्परविरोधी गोष्टी नसून, दोन्हींचा समतोल साधणे शक्य आहे, हे भारताने आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, नवनवीन संकल्पना आणि लोकसहभागाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचा मार्ग अधिक सक्षम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ब्रिटनचे राजपुत्र आणि अर्थशॉट प्राईझचे संस्थापक अध्यक्ष प्रिन्स विल्यम यांनी केले.
मुंबईतील जिओ कन्व्हेशन सेंटर येथे आयोजित अर्थशॉट प्राईझ इम्पॅक्ट असेम्ब्ली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अर्थशॉट प्राईझचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन कनौफ आणि चेअरमन जेस्पर ब्रॉडीन यांच्यासह अर्थशॉट प्राईझचे अंतिम फेरीतील स्पर्धक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
भारताच्या पर्यावरणपूरक विकासाचा उल्लेख करताना प्रिन्स विल्यम यांनी भारताच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीचे विशेष कौतुक केले. भारताने स्थापित वीज निर्मिती क्षमतेपैकी ५० टक्के क्षमता बिगरजीवाश्म ऊर्जा स्रोतांमधून निर्माण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या पाच वर्षे आधीच साध्य केले आहे. तसेच, गेल्या दशकभरात देशाची सौरऊर्जा क्षमता ५० पटींहून अधिक वाढली आहे, असे त्यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment