मुख्यमंत्री आपल्या गावात येऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत थेट पोहोचतील आणि गावाच्या विकासाच्या अपेक्षांवरही चर्चा होणार असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः गावात येत असल्याने या भेटीकडे शेतकरी आशेने बघत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गावात आवश्यक तयारी करण्यात आली आहे. गावातील नागरिक, शेतकरी आणि युवकांमध्ये या भेटीची चर्चा असून, मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थ उत्सुक आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसोबत सण साजरा करण्याच्या या उपक्रमामुळे लोहारी सावंगा गावाला राज्यस्तरावर विशेष ओळख मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. दिवाळीच्या आनंदात मुख्यमंत्र्यांचा सहभाग आणि शेतकऱ्यांशी होणारा थेट संवाद यामुळे लोहारी सावंगा येथील हा दौरा विशेष लक्षवेधी ठरेल.
No comments:
Post a Comment