शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानासह सर्वांगीण उपायांना प्राधान्य
-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
· महाराष्ट्रातील ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचे १ हजार ८३५ कोटी रुपये वितरित
· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग
मुंबई, दि. ३० : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २४ व्या हप्त्यापोटी गुजरात मधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत १ हजार ८३५ कोटी रुपयांचा निधी थेट जमा केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सहाय्याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान, सिंचन, पशुपालन आणि पूरक व्यवसायांना प्राधान्य देत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment