Thursday, 19 November 2026

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमुळे स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी

 पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमुळे स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी


– पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे


योजनांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ

ऑनलाइन पोर्टलद्वारे करता येणार मराठीतून अर्ज

            मुंबई, दि. १८ : पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या २१ योजनांचा ऑनलाइन पोर्टलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या महिन्यात शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल


        पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एन. रामस्वामी, सहआयुक्त तसेच विविध अधिकारी उपस्थित होते.

            पशुसंवर्धन मंत्री मुंडे म्हणाल्या, शेळी-मेंढी गटांचे वाटप, दुधाळ गायी-म्हशींचे संगोपन आणि कुक्कुटपालन यांसह विविध व्यवसायांसाठी या योजनांमधून निधी व शासनाचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनांमुळे शेतकरी, बेरोजगार युवक-युवती आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            पशुसंवर्धन विभागाने महाआयटीच्या समन्वयातून ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. इच्छुक अर्जदारांना ‘महा आयडी’ तयार करून या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येईल. पोर्टलवर मराठीतूनही अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. राज्य शासन नऊ योजना, जिल्हा वार्षिक योजनेतील नऊ योजना आणि अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून तीन योजनांसाठी निधी देण्यात येईल असे पशुसंवर्धन मंत्री मुंडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi