मुंबई वाटर मेट्रो हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रक्रियांना गती द्यावी असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
बैठकीत दिघी येथील मत्स्य उतराई केंद्राच्या निविदा आणि रेवदंडा येथील रो-रो जेट्टीच्या बांधकाम प्रस्तावावरही चर्चा झाली. संबंधित यंत्रणांना सर्व विलंबित प्रकल्पांची संपूर्ण यादी पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश दिले. या यादीमध्ये प्रकल्प मंजुरीचे वर्ष, मूळ कालमर्यादा, आतापर्यंत दिलेल्या मुदतवाढी, विलंबाची कारणे, आवश्यक मंजुऱ्यांची सद्यस्थिती आणि कामाची प्रगती यांचा समावेश करावा. प्रकरणनिहाय निर्णय घेण्याऐवजी सर्व प्रलंबित प्रकल्पांचा एकत्रित आढावा घेऊन समान निकषांनुसार निर्णय घेतला जाईल असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. यावेळी महाराष्ट्र सागरी धोरण 2026 चा मसुदा मंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला.
No comments:
Post a Comment