जलआधार'मुळे ग्रामीण जलसुरक्षेला बळ
'जलआधार' उपक्रमांतर्गत पालघर, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांतील ६० हून अधिक गावांमधील १ लाख ३० हजारांपेक्षा अधिक नागरिकांसाठी जलसुरक्षा निर्माण करण्यास हातभार लागला आहे. ६०० हून अधिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून, दरवर्षी ८ हजार ५०० लाख लिटरपेक्षा अधिक पाणीसाठवण क्षमता निर्माण झाल्याचा अंदाज आहे.
सातारा जिल्ह्यातील दहा गावांमध्ये १० हजार हेक्टर क्षेत्रावर एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यात येत असून, जलसंधारणासह शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment