मंत्री तटकरे यांनी मुलींच्या अडचणी समजून घेत त्यांच्या सूचनांची दखल घेतली. बालगृहातील सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी प्रशासन सकारात्मक असून, मुलींच्या हितासाठी आवश्यक ती मदत आणि सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, बालदिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘एक दिवसाची जिल्हाधिकारी’ या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, सोरापाडा येथील इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आचल धीरज वसावे हिला जिल्हाधिकारी म्हणून कामकाज समजून घेण्याची संधी मिळाली. तिने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. विद्यार्थिनींमध्ये प्रशासकीय सेवेविषयी आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.
No comments:
Post a Comment