Tuesday, 3 November 2026

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक

 आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक

            शहर सुरक्षित ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान गरजेचे आहे. डायल 112 मुळे प्रतिसादाची वेळ 3 मिनिटावर आली आहे आणि पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय याबाबतीत राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. गुन्हे घडताना तात्काळ प्रतिसाद देऊन पोलीस कारवाई करताना दिसत आहेत. याची डिजीटल माहिती उपलब्ध होत आहे. गुन्हेगारांवर यामुळे वचक बसतांना दिसत आहे.

 

            रस्त्यावरील गुन्हे पूर्णत: नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढते आहे. सीसीटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून वाहतूक, गुन्हे नियंत्रणाचे काम शक्य होत आहे. एआय तंत्रज्ञानाद्वारे मानवी मर्यादांवर मात करून गुन्ह्यांचा तपास करता येतो. एआय आधारित ‘तपास सारथी’मुळे तपास सुरू झाल्यापासून न्यायालयात जाईपर्यंत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे तपास व आरोपपत्र तयार करण्याचे काम होत आहे. यामुळे गुन्हे नियंत्रणात निश्चितपणे उपयोग होणार आहे.

 

            पोलीस दलदेखील नवे तंत्रज्ञान आत्मसात करताना दिसत आहेत. बॉडीवॉर्न कॅमेऱ्यामुळे कमांड ॲण्ड कन्ट्रोल सिस्टीमलादेखील गुन्हे तपासाची माहिती मिळण्यासोबत पोलिसांना सुरक्षितता मिळणार आहे. वाहतुकीच्या तक्रारीदेखील यामुळे येत्या काळात कमी होतील. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अत्यंत कमी कालावधीत चांगली प्रगती केल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. पुढील 15 वर्षात पिंपरी चिंचवड परिसरात पुण्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणार असल्याने पोलीस दलाने त्यादृष्टीने सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi