Monday, 2 November 2026

सिंचनावरील खर्च कमी करण्यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १२ लाख सौरपंप कर्ज

 सिंचनावरील खर्च कमी करण्यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १२ लाख सौरपंप कर्ज सिंचनावरील खर्च कमी करण्यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १२ लाख सौरपंप देण्यात आले आहेत. या पंपांमुळे शेतकऱ्यांची ८० कोटी लिटरपेक्षा अधिक डिझेलची बचत झाली आहे. याशिवाय अतिरिक्त वीज निर्मितीचाही शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी स्पष्ट केले.

 

            बदलत्या हवामानाशी सुसंगत बियाण्यांच्या सुमारे तीन हजार नव्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून, राष्ट्रीय गोकुळ अभियानातून देशी पशुधनाचे संवर्धन आणि वैज्ञानिक प्रजननाला चालना दिली जात आहे. पशूंना लाळ्या-खुरकुत रोगापासून वाचविण्यासाठी देशभर मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे १५० कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून, ८ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पशुधनाला त्याचा लाभ झाला आहे. देशातील गाय आणि म्हशींचे प्रतिदिन सरासरी दूध उत्पादन २०१३-१४ मधील पाच लिटरपेक्षा कमी पातळीवरून आता सुमारे आठ लिटरपर्यंत वाढल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी नमूद केले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi