Saturday, 3 October 2026

ऑक्टोबर हा महिना जगभरात सायबर सुरक्षा जनजागृती महिना म्हणूनइंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर (I4C), केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स

 ऑक्टोबर हा महिना जगभरात सायबर सुरक्षा जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. मोहिमेच्या शुभारंभानिमित्त बीएसईच्या पारंपरिक घंटानादाच्या धर्तीवर ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ हा प्रतीकात्मक उपक्रम राबविण्यात आला. सुरक्षित सायबर अवकाशासाठी शासन आणि उद्योग क्षेत्राची सामूहिक बांधिलकी यातून व्यक्त करण्यात आली. यावेळी मोहिमेच्या ‘सायबर अँथम’चेही अनावरण करण्यात आले.

या मोहिमेला इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In), केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर (I4C), केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, महाराष्ट्र शासन तसेच बीएसईसह विविध उद्योग भागीदारांचे सहकार्य लाभले.

भारतीय पारंपरिक कठपुतळी कथाकथन कलेचा डिजिटल युगासाठी वापर करून सायबर सुरक्षेचे संदेश सहज समजतील, लक्षात राहतील आणि नागरिकांना इतरांपर्यंत पोहोचविता येतील, अशी मोहिमेची रचना आहे. या माध्यमातून मोबाइल ॲप, ई-मेल, समाजमाध्यमे आणि डिजिटल व्यवहारांमधील सुरक्षित सवयींबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. एपीकेद्वारे होणारी फसवणूक, एआय व्हॉइस क्लोनिंग, रिअल टाइम डीपफेक, ‘डिजिटल अटक’, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फसवणूक आणि अन्य उदयोन्मुख धोक्यांची माहितीही दिली जाणार 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi