Saturday, 10 October 2026

नवमतदारांना नोंदणीची संधीनिवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करता येईल.

 नवमतदारांना नोंदणीची संधी

            १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार तसेच अन्य पात्र असूनही प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना नमुना-६ भरून नाव नोंदविता येईल. त्यासाठी आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

 

            हे अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे ऑफलाइन पद्धतीने सादर करता येतील. तसेच १० व ११ ऑक्टोबर रोजी आयोजित विशेष शिबिरांमध्येही अर्ज दाखल करता येतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करता येईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi