Saturday, 17 October 2026

वैद्यकीय तज्ज्ञांनी ५२ हजार तरूणांना दिले आरोग्याचे धडे ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला उत्सफूर्त प्रतिसाद

 वैद्यकीय तज्ज्ञांनी ५२ हजार तरूणांना दिले आरोग्याचे धडे

  • ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला उत्सफूर्त प्रतिसाद

 

            मुंबई, दि. १६:- बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण यामुळे तरुणांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज वाढली आहे. ही गरज लक्षात घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळावे, यासाठी नवरात्रोत्सव काळात राज्यात ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद, जागर आरोग्याचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत राज्यात आतापर्यंत ३९३ सत्रे झाली असून, ५२ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

 

            तरुण वयातच आरोग्याची काळजी घेण्याच्या योग्य सवयी लागाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि निरोगी जीवनशैली यांचे महत्व समजावे, तसेच आरोग्यविषयक प्रश्नांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे, यासाठी ही सत्रे आयोजित केली जात आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi