Saturday, 17 October 2026

मैदाने आणि उद्यानांची विद्यार्थ्यांकडून मागणी

 मैदाने आणि उद्यानांची विद्यार्थ्यांकडून मागणी

विद्यार्थ्यांनी शहरातील खेळाची मैदाने, उद्याने आणि सायकल चालविण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी खेळाच्या मैदानांचे महत्त्व अधोरेखित केले. मुंबईत अधिकाधिक मैदाने खेळण्यासाठी खुली करणे तसेच त्याठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि चांगली उद्याने विकसित करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

सायकल चालविण्यासाठी स्वतंत्र मार्ग असावेत, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. त्यावर, मुंबईतही काही ठिकाणी सायकल ट्रॅक तयार करण्यात आले असून आणखी काही ठिकाणी असे मार्ग विकसित करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi