Thursday, 22 October 2026

गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल’च्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकतेला चालना देणार

 गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल’च्या माध्यमातून

ग्रामीण उद्योजकतेला चालना देणार

– अध्यक्ष रविंद्र माणगावे

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत असलेले गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिलचे अध्यक्ष रविंद्र माणगावे म्हणाले की, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत असलेली गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल (जीटीयूआयसी) हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात युवांना आणि महिलांना रोजगार मागणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करणारा हा उपक्रम आहे. ग्रामीण भागात अनेक युवक, महिला आणि स्थानिक कारागीर यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्याची क्षमता व कल्पना असतात मात्र, योग्य मार्गदर्शन, भांडवल, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि शासकीय योजनांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायवाढीला मर्यादा येतात. ही दरी भरून काढण्यासाठी गावपातळीपासून जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत संस्था काम करीत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने जिल्हास्तरीय उद्योग विषयक मार्गदर्शन व प्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी ही संस्था काम  करत आहे, अशी संस्थेची माहिती दिली. ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’स्पर्धेसाठी जास्तीत जास्त सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा,रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगूरु डॉ.अपूर्वा पालकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत असलेले गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिलचे  अध्यक्ष  रविंद्र माणगावे यांनी करारावर स्वाक्षरी केली. आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, शिवाजी मानकर, शिखर जैन, रामेश्वर पवार, सुरेश घोरपडे, अण्णासाहेब पाटील, दिवाकर केसकर, ॲड. रिचा पाठक,अक्षता भांबळे,विशाल बंडगर, जितू चव्हाण यावेळी उपस्थित होते.

0000

संध्या गरवारे/विसंअ


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi