नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील
-कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा
· रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन
कौन्सिल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्टी अँड ॲग्रीकल्चर यांच्यासोबत सामंजस्य करा
मुंबई, दि. २१ : ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत राज्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, महाराष्ट्रातील तरुण नवोन्मेषक,विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील स्टार्टअप्सना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागातंर्गत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत कार्यरत असलेली गाव तिथे उद्योजक इनक्यूबेशन कौन्सिल (जीटीयूआयसी) यांच्यात सामंजस्य करार झाला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment