Tuesday, 6 October 2026

छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक घराला नळजोडणी द्यावी

 छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक घराला नळजोडणी द्यावी


            छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करताना शहरात प्रत्येक घराला नळजोडणी मिळेल याची दक्षता घ्यावी. नळ जोडणी देताना पुन्हा खोदकाम करावे लागणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन करावे. यंत्रणांनी कंत्राटदारांकडून केवळ पुरेसे काम करून न घेता निर्धारित उद्दिष्ट साध्य होईल, अशा पद्धतीने प्रकल्प पूर्ण करून घ्यावेत. कामामध्ये विलंब तसेच पूर्णत्वाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही काम पूर्ण न होणाऱ्या प्रकल्पांच्या कंत्राटदारांवर काळया यादीत टाकण्याची कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मेट्रो मार्गिका क्रमांक सहा मधील स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी दरम्यान जमिनीच्या ताब्याबाबत व न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित कार्यवाही गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi