Monday, 19 October 2026

युवकांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये जनजागृती रॅली व दुर्गापूजा मंडपातून ‘नशामुक्त भारत’चा संदेश

 दुर्गापूजा मंडपातून ‘नशामुक्त भारत’चा संदेश

युवकांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये जनजागृती रॅली व विविध कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत युवकांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. दुर्गापूजेच्या मंडपातही ‘से नो टू ड्रग्ज’ चा संदेश देऊन उपस्थितांना व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले.

 

जिओ वर्ल्ड येथे नवरात्रोत्सवात राज्यपालांचा सहभाग

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथील जॅस्मिन हॉलमध्ये आयोजित फाल्गुनी पाठक यांच्या ‘नवरात्रोत्सव २०२६’ कार्यक्रमालाही भेट दिली. या कार्यक्रमात त्यांनी देवीची विधिवत पूजा केली तसेच आरतीमध्ये सहभाग घेतला. यावेळी  माजी खासदार मनोज कोटक, गायिका फाल्गुनी पाठक आणि आसिफ भामला उपस्थित होते.

 

या कार्यक्रमातही राज्यपालांच्या उपस्थितीत ‘से नो टू ड्रग्ज’ अर्थात अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा  संदेश देण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जपत युवकांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi