Monday, 19 October 2026

नशामुक्त भारत’चा संदेशदुर्गापूजा सर्वांचा उत्सव; मा दुर्गेची कृपा सर्वांवर राहो

 दुर्गापूजा सर्वांचा उत्सव; मा दुर्गेची कृपा सर्वांवर राहो

-         राज्यपाल जिष्णु देव वर्मा

·         दुर्गापूजा आणि नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांना राज्यपालांची उपस्थिती; ‘नशामुक्त भारत’चा संदेश

 

मुंबई, दि. 19  : दुर्गापूजा हा सर्व धर्म, वर्ण आणि समाजातील लोकांना एकत्र आणणारा उत्सव आहे. दुर्गापूजा सामाजिक एकता, आनंद आणि बंधुभावाचा संदेश देते. सर्वांनी आनंदात आणि सुरक्षितपणे दुर्गापूजेचा उत्सव साजरा करावा, तसेच मा दुर्गेची कृपा सर्वांवर राहो, अशा शुभेच्छा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दिल्या.

 

जुहू येथील स्पोर्ट्स ग्राउंडवर बंगाल कल्चरल असोसिएशनच्या वतीने आयोजित दुर्गापूजा समारोहाला राज्यपालांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दुर्गापूजेच्या निमित्ताने उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. बंगाली भाषेचे दुर्गापूजेतील महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी बंगाली आणि हिंदी भाषिकांमधील भाषिक सलोख्याचाही उल्लेख केला. दुर्गापूजेचा उत्सव संपल्यानंतर बंगाली समाज पुढील वर्षाच्या पूजेच्या तयारीला लागतो, असे नमूद करत त्यांनी या उत्सवाशी जोडलेल्या सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व सांगितले. यावेळी बंगाल कल्चरल असोसिएशनचे संस्थापक व अध्यक्ष  कृष्णेंदू सेन उपस्थित होते. यावेळी राज्यपाल  जिष्णु देव वर्मा दुर्गापूजेच्या विधीमध्ये सहभागी झाले.

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi