दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
- मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत २०२६-२७ या वर्षासाठी विशेष सवलत
- पशुधनाची किमान संख्या असण्याची अट शिथिल
- वैयक्तिक लाभार्थी व शेतकरी गटांना एकापेक्षा अधिक वेळा लाभाची संधी
पुणे, दि. १६ (जिमाका वृत्तसेवा) : राज्यात २०२६-२७ मध्ये कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील पशुपालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’च्या अटी शिथिल केल्या आहेत. चारा टंचाईवर मात करण्यासाठी या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी तसेच शेतकरी गटांना अतिरिक्त चारा बियाणे व ठोंबे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही सवलत केवळ २०२६-२७ या वर्षासाठी लागू राहणार आहे.
योजनेच्या ९ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, वैयक्तिक लाभार्थ्याकडे स्वतःचे किमान तीन ते चार पशुधन असणे आवश्यक होते. मात्र, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ही किमान पशुधनाची अट चालू वर्षासाठी शिथिल करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment