केवळ सुशिक्षित नव्हे, तर जबाबदार नागरिक घडविणे आवश्यक
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ उपक्रमांचे उद्घाटन
मुंबई, दि. १६ : शिक्षणाद्वारे केवळ सुशिक्षित व्यक्ती नव्हे, तर अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव असलेला, समाजाप्रती आस्था व संवेदनशीलता बाळगणारा आणि देशाप्रती जबाबदारी असलेला नागरिक घडला पाहिजे. शिक्षणातून समाजाला समर्पित आणि मूल्यनिष्ठ नागरिक घडले, तरच देशाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने गती मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत (स्मार्ट नागरिक)’ या शैक्षणिक उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागरिकशास्त्र आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित अभ्यासक्रमांचे ‘स्मार्ट नागरिक’ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिकांचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांना विविध संवाद माध्यमांतून जगभरातील माहिती सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे माहितीपूर्ण आणि हुशार पिढी घडत असली, तरी तिच्यात सामाजिक जाणीव आणि कर्तव्यभावना रुजविणे तितकेच महत्वाचे आहे. समाजाने उभ्या केलेल्या व्यवस्थेमुळे आपल्याला शिक्षण घेता येते आणि व्यक्तिमत्व विकसित करता येते. त्यामुळे समाजाप्रती आपलीही काही जबाबदारी आहे, याचे भान विद्यार्थ्यांना असले पाहिजे.
No comments:
Post a Comment