Tuesday, 13 October 2026

सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत आयोजितविद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला राज्यस्तरीय व्यासपीठ

 सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील कलात्मक अभिव्यक्ती, सर्जनशीलता आणि कला क्षेत्राविषयीची आवड वृद्धिंगत करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या कलात्मक वाटचालीला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

 

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला राज्यस्तरीय व्यासपीठ

या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रातील शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा, सर्जनशीलतेचा आणि कलात्मक अभिव्यक्तीचा आविष्कार घडवत विविध विषयांवर उत्कृष्ट कलाकृती साकारल्या. या कलाकृतींमधून निवडलेल्या उत्कृष्ट कलाकृतींच्या निर्मात्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिकांसह पाच प्रोत्साहनपर पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, नवोदित कलाकारांना आपल्या कलाकृती व्यापक स्तरावर सादर करण्याची संधी उपलब्ध करून देणे, तसेच कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणा देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”

 

१६ ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले

सर जे. जे. कला महाविद्यालय, मुंबई येथे आयोजित हे चित्रकला प्रदर्शन शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाची वेळ दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून, कलाप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi