Sunday, 11 October 2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन अभियानात दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्या

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

 

अभियानात दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्यमुख्

 

·         मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पहिल्या पर्वातील पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

 

            नाशिक, दि. 11 ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे, तलावांतील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या कामांसाठी राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही  त्यांनी दिली.

            ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्यावतीने आयोजित ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान लोकप्रतिनिधींचा महाकुंभ’, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा, अभियान २०२६-२७ चा शुभारंभ तसेच ‘सरपंच परिसंवाद – दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

            यूथ फेस्टिव्हल मैदानावर आयोजित या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि राज्यभरातील सरपंच उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi