मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामीण भागातील सामूहिक शक्तीला चालना देऊन गावांच्या विकासाला गती देणारे महत्त्वपूर्ण अभियान आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास ग्रामीण भागात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते, हे जलयुक्त शिवार अभियानाने सिद्ध केले आहे. याच अनुभवातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अभियानात सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांचे अभिनंदन करून ते म्हणाले, गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. अभियानामुळे गावांमध्ये रस्ते, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही यंत्रणा, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे. पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींसह अंतिम १२ ग्रामपंचायतींना स्वतः भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment