Thursday, 1 October 2026

अतितीव्र चक्रीवादळाची परिस्थिती गृहीत धरून किनारी, खाडी आणि नदीनमुख परिसरात समुद्राच्या पाण्याची पातळी

 अतितीव्र चक्रीवादळाची परिस्थिती गृहीत धरून किनारी, खाडी आणि नदीनमुख परिसरात समुद्राच्या पाण्याची पातळी सुमारे तीन मीटरपर्यंत वाढणे, तसेच २४ ते ३६ तासांत ७५ ते २०० मिलिमीटर पर्जन्यमान होणे अशी काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात येणार आहे. या परिस्थितीत नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, शोध व बचाव कार्य, मच्छीमार व नौकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना, वैद्यकीय प्रतिसाद व आपत्कालीन आरोग्य सेवा, तात्पुरत्या निवारा केंद्रांचे व्यवस्थापन, वाहतूक व गर्दी नियंत्रण, वीज, पाणीपुरवठा आणि दूरसंचार सेवा पुनर्संचयित करण्याची तयारी यांचा सराव केला जाणार आहे.तसेच विविध विभागांमधील समन्वय आणि नियंत्रण प्रणालीची कार्यक्षमता तपासली जाणार असून, संबंधित ठिकाणी इन्सिडेंट कमांड पोस्ट, स्टेजिंग एरिया, रिलीफ कॅम्प, मेडिकल एड पोस्ट यांसारख्या सुविधा कार्यान्वित करून घटना प्रतिसाद प्रणालीची चाचणी घेण्यात येणार आहे. ही रंगीत तालीम प्रत्यक्ष चक्रीवादळाची पूर्वसूचना नसून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी आयोजित नियोजित सराव असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तालीमदरम्यान विविध ठिकाणी बचाव पथके, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने, पोलीस, नौका आणि इतर आपत्कालीन संसाधनांची हालचाल दिसून येईल. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता प्रशासनास सहकार्य करावे. तसेच अफवा, अप्रकाशित संदेश किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये. रंगीत तालीमेसंदर्भातील अधिकृत माहिती केवळ प्रशासन आणि अधिकृत शासकीय माध्यमांद्वारेच प्रसारित केली जाईल.


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi