ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी राज्य शासन प्रयत्नशील
-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
केंद्र शासनाकडे शिष्टमंडळ नेणार
विविध शेतकरी संघटनांसोबत बैठक संपन्न
मुंबई, दि. १४ : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. तसेच साखरेची आधारभूत किंमत आणि ऊस उत्पादकांच्या रास्त व किफायतशीर दरासंदर्भातील (एफआरपी) मागण्यांवर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ केंद्र शासनाकडे नेण्यात येईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सां
गितले.
No comments:
Post a Comment