महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीस राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
-कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
- महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीसाठी ३७ लाखांहून अधिक महिलांचे अर्ज प्राप्त
मुंबई, दि. ७: महिला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील योगदानाची अधिकृत ओळख मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीसाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ७ ऑक्टोबर पर्यंत राज्यभरातून तब्बल ३७ लाख ९३ हजार ५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील प्रत्येक पात्र महिला शेतकरी या उपक्रमाशी जोडली जावी, यासाठी कृषी विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment