Wednesday, 7 October 2026

हिवाळी अधिवेशनात ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यात सुधारणा विधेयक आणणार,वारंवार गुन्हा करणा-यांवर मोका लावणार · बोगस डॉक्टरांची यादी होणार प्रसिद्ध

 हिवाळी अधिवेशनात ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यात सुधारणा विधेयक आणणार

-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

·         वारंवार गुन्हा करणा-यांवर मोका लावणार

·         बोगस डॉक्टरांची यादी  होणार प्रसिद्ध

 

            मुंबई, दि ६ :  प्रसुतीपूर्व  गर्भ लिंग निदान करून स्त्री भ्रुण हत्या करणा-या डॉक्टरांवर  कठोर कारवाई होण्यासाठी गर्भधारणा पूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ व २००३ मध्ये  सुधारणा करणे आवश्यक आहे. असे गुन्हे करणाऱ्या डॉक्टरांवर लावण्यात येणारे कलम अधिक कठोर करण्यासोबतच, गुन्हेगारांवर मोक्का लावणे, गुन्हे सिद्धता आणि शिक्षा यात बदल करणे आवश्यक असून येत्या हिवाळी अधिवेशनात  या कायद्यात सुधारणा विधेयक सादर करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

 

            गर्भधारणा पूर्व  व प्रसुतीपूर्व निदानतंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध कायदा १९९४ व २००३ च्या कठोर अंलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृती दलाची पहिली बैठक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली, यावेळी ते बोलत होते. 

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi