Thursday, 17 September 2026

मॅग्मो संघटनेच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

 मॅग्मो संघटनेच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

  • सेवा विषयक मागण्यांवर कालबद्ध कार्यवाही

 

            मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र  राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या राज्यातील वैद्यकीय अधिकारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवा समावेशन, खासगी प्रॅक्टिस न करण्याबद्दलचा भत्ता, गतिशील सुनिश्चित कारकिर्द प्रगती योजना लागू  करणे आदि मागण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मॅग्मो संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.

 

            सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध सेवा विषयक मागण्यांबाबत आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आबिटकर बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. संजय काटकरमॅग्मो संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. संदिप गेडाम, कार्यकारी अध्यक्ष मनोज खोमणे आदि सदस्य उपस्थित होते.

 

            विभागीय उपसंचालकांनी प्रत्येक प्रकरणाचा नियमित आढावा घेऊन वैद्यकीय अधिकारी व कंत्राटी कर्मचा-यांची प्रलंबित देयके निकाली काढावीत. देय असलेली रक्कम तातडीने अदा करावी. तसेच मागील पाच वर्षापासून प्रलंबित असलेला खासगी प्रॅक्टिस न केल्याबद्दलचा भत्ता लवकरात लवकर वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात यावा अशा सूचनाही मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

 

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi