Wednesday, 23 September 2026

माडग्याळ आणि सनमाडी गावांतील स्थानिक मेंढीपालकांनी सुमारे १०० वर्षांपूर्वी निवड पैदास पद्धतीने

 धनगर आणि रामोशी समाजातील मेंढपाळ तसेच शेतकरी माडग्याळ मेंढ्यांचे पालन करतात. विषम हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता, उत्तम रोगप्रतिकारशक्ती, जलद वजनवाढ, कोकरांच्या जगण्याचे अधिक प्रमाण, चांगली मातृत्व प्रवृत्ती आणि मांस उत्पादनासाठी उपयुक्तता या वैशिष्ट्यांमुळे ही मेंढी लोकप्रिय होत आहे.

 

सांगली जिल्ह्यातील माडग्याळ आणि सनमाडी गावांतील स्थानिक मेंढीपालकांनी सुमारे १०० वर्षांपूर्वी निवड पैदास पद्धतीने या मेंढीची पैदास केली. माडग्याळ ही महाराष्ट्रातील मोठ्या आकाराची आणि मांस उत्पादनासाठी विशेष लोकप्रिय मेंढी आहे. या मेंढ्या प्रामुख्याने पांढऱ्या रंगाच्या असून त्यांच्यावर तपकिरी ठिपके आढळतात; काही मेंढ्या पूर्णपणे तपकिरी रंगाच्याही असतात.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi