माडग्याळ मेंढीला स्वतंत्र राष्ट्रीय प्रजातीच्या मान्यतेबद्दल
पशुधन संवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचा धनगर समाजाकडून सत्कार
मुंबई, दि. २२ : माडग्याळ मेंढीला अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता दिल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचा मंत्रालयात सत्कार केला. माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र आणि अधिकृत प्रजाती म्हणून मिळालेल्या मान्यतेमुळे तिचे संवर्धन, जतन आणि आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांना मोठी चालना मिळेल, असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध उमरडा गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर माडग्याळ मेंढीला स्वतंत्र अधिकृत प्रजाती म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरोने नोंदणी दिली आहे. या निर्णयाबद्दल जत तालुक्यातील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने मंत्री पंकजा मुंडे यांचा गोधडी, काठी व माडग्याळ मेंढीची प्रतिकृती देऊन सत्कार केला.
माडग्याळ मेंढीला मिळालेली मान्यता ही जत परिसरातील पशुपालकांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment