Wednesday, 2 September 2026

राज्यातील विद्यार्थ्यांना केवळ पदवीचे शिक्षण न देता त्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये मिळणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजा

 मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,  राज्यातील विद्यार्थ्यांना केवळ पदवीचे शिक्षण न देता त्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये मिळणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजा आणि विद्यार्थ्यांची कौशल्ये यांची सांगड घालण्यासाठी महाविद्यालयांनी उद्योग, कंपन्या आणि उद्योजकांशी समन्वय वाढवावा. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावे आणि ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करावेत, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

रोजगार महाकुंभ’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी विविध कंपन्या, उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत तरुणांना थेट मुलाखतीची संधी मिळू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचण्याबरोबरच त्यांच्या कौशल्याला अनुरूप रोजगार मिळण्यास मदत होईल.

महाविद्यालयांनी आपल्या परिसरातील उद्योगांची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगार मेळावे नियमितपणे आयोजित करावेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी मिळावी, यासाठी शिक्षणसंस्था आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

रोजगार महाकुंभ’ हा उपक्रम राज्यातील तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतो. त्यामुळे अधिकाधिक महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभागी होऊन तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi