‘रोजगार महाकुंभ’ उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी
- रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांना आवाहन
मुंबई, दि. १ : राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात 'रोजगार महाकुंभ' आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयात रोजगार महाकुंभ महाराष्ट्र आयोजित करण्यासंदर्भात बैठक करण्यात आली. यावेळी कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा संबधित विभागाचे सचिव उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांना केवळ पदवीचे शिक्षण न देता त्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये मिळणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्राच्या गरजा आणि विद्यार्थ्यांची कौशल्ये यांची सांगड घालण्यासाठी महाविद्यालयांनी उद्योग, कंपन्या आणि उद्योजकांशी समन्वय वाढवावा. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावे आणि ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करावेत, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment