Friday, 11 September 2026

विकसित भारत २०४७’ या संकल्पनांच्या पूर्ततेसाठी योग्य धोरणांसोबतच त्यांची अंमलबजावणी

 विकसित भारत २०४७या संकल्पनांच्या पूर्ततेसाठी योग्य धोरणांसोबतच त्यांची अंमलबजावणी करणारे तत्पर प्रशासनही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक परिस्थितीत वैयक्तिक हितापेक्षा सांविधानिक मूल्यांना आणि नागरिकांशी न्याय्य वर्तनाला महत्व देण्याचे आवाहनही राज्यपाल वर्मा यांनी केले.

 

            यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे म्हणाले, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा आधारित शासन, पर्यावरणीय आव्हाने आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे प्रशासनाचे स्वरूप वेगाने बदलत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये आजीवन शिकण्याची वृत्ती, नैतिक नेतृत्व आणि लोकसेवेची भावना विकसित करणे आवश्यक आहे. यशदा आता केवळ प्रशिक्षण संस्थेपुरती मर्यादित न राहता लर्निंग फॅसिलिटेटरम्हणून काम करीत आहे. प्रशिक्षणासोबत संशोधन, सल्लागार सेवा, सहयोग आणि ज्ञान व्यवस्थापनाची सांगड घालण्यात आली आहे. यासाठी ३ आंतर-विभागीय प्रभाग आणि ८ उत्कृष्टता केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तंत्रज्ञान प्रशासनाला गती देऊ शकते; मात्र सहानुभूतीमुळे प्रशासनाला मानवी चेहरा मिळतो, असे त्यांनी सांगितले.

 

            सीपीटीपी विभागाच्या प्रमुख पौर्णिमा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सक्षम, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ अधिकारी घडवणे हे यशदाचे ध्येय असल्याचे त्या म्हणाल्या.

 

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते सीपीटीपीच्या संकेतस्थळाचे अनावरण आणि प्रशिक्षण मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi