Wednesday, 9 September 2026

प्रगती प्रकल्पामुळे पाच जिल्ह्यातील १,६०० खाटांची आरोग्य सुविधा बळकट होणार

 प्रगती प्रकल्पामुळे पाच जिल्ह्यातील १,६०० खाटांची आरोग्य सुविधा बळकट होणार

- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

  • महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ
  • ,२५० कोटींच्या प्रगतीप्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

 

मुंबई, दि. ८ : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रगती’ (प्राथमिक आरोग्यसेवेची नव्याने उभारणी, प्रगत प्रशासन आणि सुलभ तंत्रज्ञानाचा समन्वय) या राज्यस्तरीय सार्वजनिक आरोग्य सुधारणा प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे आरोग्य सेवांचा विस्तार, गुणवत्तावाढ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांना गती मिळणार आहे. पाच जिल्ह्यांत जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणार असल्याने १,६०० खाटांची वाढ अपेक्षित असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

 

२०२६ ते २०३१ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४,२५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये आशियाई विकास बँकेकडून ७० टक्के म्हणजे सुमारे २,९७५ कोटी रुपये कर्ज, तर ३० टक्के म्हणजे १,२७५ कोटी रुपये राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi