Wednesday, 9 September 2026

पाच जिल्ह्यांत १,६०० खाटांची वाढ ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मोठी बळकटी

 पाच जिल्ह्यांत १,६०० खाटांची वाढ

प्रगतीप्रकल्पांतर्गत पाच जिल्ह्यांतील रुग्णालयांना मोठी बळकटी देण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि नांदेड येथे प्रत्येकी ५०० खाटांची नवीन जिल्हा रुग्णालये, पुणे येथे २०० खाटांचे संदर्भसेवा रुग्णालय, तर लातूर आणि नागपूर येथील प्रत्येकी २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. या माध्यमातून एकूण १,६०० खाटांची क्षमता वाढणार असून, त्यासाठी अंदाजे १,५०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. जिल्हास्तरावरच निदान, उपचार आणि संदर्भ सेवा उपलब्ध झाल्याने तृतीय स्तरावरील रुग्णालयांवरील अनावश्यक भार कमी होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi