Tuesday, 29 September 2026

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची केंद्र शासनाने घेतली गंभीर दखल· केंद्रीय पथक महाराष्ट्रात पाहणी करणार

 महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची केंद्र शासनाने घेतली गंभीर दखल· केंद्रीय पथक महाराष्ट्रात पाहणी करणार


· कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दौरा करणार


नवी दिल्ली, दि. 28 : महाराष्ट्रातील सुमारे दोन-तृतीयांश भूभाग दुष्काळाने प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने राज्यातील परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठविण्यात येणार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.


नवी दिल्लीतील पुसा येथील भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृहात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कृषी संमेलन–रब्बी अभियान 2026 च्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर व भागीरथ चौधरी, केंद्रीय कृषी सचिव अतीश चंद्रा, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट यांच्यासह केंद्र व विविध राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्रातील सुमारे दोन-तृतीयांश क्षेत्र दुष्काळाच्या विळख्यात असल्याचे नमूद करत चौहान यांनी केंद्र सरकार राज्यातील परिस्थितीबाबत गंभीर असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रासह कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीचे केंद्रीय पथक प्रत्यक्ष पाहणी करून आकलन करणार आहे. कर्नाटकात 3 ऑक्टोबर रोजी केंद्रीय पथक दाखल होणार असून, त्यानंतर महाराष्ट्रातही पथक पाठविण्यात येणार आहे. आपण स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या राज्यांचा दौरा करणार असल्याचे चौहान यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi