पाण्याचा ताळेबंद पाहूनच रब्बीचे नियोजन
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातील पीक नियोजन उपलब्ध पाण्याच्या ताळेबंदावर आधारित असावे, असे चौहान यांनी स्पष्ट केले. प्रत्येक राज्य आणि जिल्ह्याने सिंचनासाठी उपलब्ध पाणी तसेच जमिनीतील ओलावा यांचे मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी.
पाणीटंचाई असलेल्या महाराष्ट्रातील भागांमध्ये कमी पाण्यात येणारी कडधान्ये आणि तेलबिया पिकांना प्राधान्य द्यावे. पुरेशी सिंचन सुविधा असलेल्या भागात उपलब्ध पाण्यानुसार अन्य पिकांचे नियोजन करावे. उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज असलेले पीक घेतल्यास नंतर पाणीटंचाईमुळे पीक संकटात येण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील दुष्काळी परिस्थितीचा संदर्भ देताना पाण्याची उपलब्धता, जमिनीतील ओलावा आणि त्यानुसार योग्य पीक यांचे नियोजन आधीच करणे आवश्यक असल्याचे चौहान यांनी सांगितले. पेरणीला विलंब झाल्यास उगवण आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि अन्य निविष्ठांची पूर्वतयारी करून वेळेत पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
No comments:
Post a Comment