Saturday, 5 September 2026

बजाज फिनसर्व्हचा कॅम्पस पुण्याच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला बळ देईल

 बजाज फिनसर्व्हचा कॅम्पस पुण्याच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला बळ देईल

-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

 

            बजाज समूहाचा शंभर वर्षांचा वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची दूरदृष्टी यांचा सुंदर संगम बजाज फिनसर्व्हच्या नव्या कॅम्पसमध्ये पाहायला मिळणार असून, हा कॅम्पस पुण्याच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला अधिक बळ देणारा ठरेल,  असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

 

            बजाज फिनसर्व्हचा महाराष्ट्र शासनासोबत ६ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला असून, त्यातून राज्यातील गुंतवणूक आणि वित्तीय सेवा क्षेत्राला चालना मिळेल.  कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वित्तीय सेवांना नवी दिशा देण्याचा बजाज समूहाचा प्रयत्न उल्लेखनीय आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाल्या.

 

            कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, इन्शुअरटेक, डेटा ॲनालिटिक्स आणि डिजिटल वित्तीय सेवा यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये पुण्यातील तरुणांसाठी रोजगार व कौशल्यविकासाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. या आधुनिक कॅम्पसमुळे नव्या कौशल्यांना, कल्पनांना आणि तरुण पिढीला अधिक संधी मिळतील, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. बजाज समुहाचे आकुर्डी, वाळूज आणि चाकण परिसराच्या औद्योगिक विकासातही समूहाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

            बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले,  पुण्यातील ७.२ दशलक्ष चौरस फुटांचा नवा परिसर शाश्वतता

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi