प्रस्तावित टास्क फोर्स आणि संयुक्त प्रकल्प
पणनमंत्री श्री रावल म्हणाले, प्रिसिजन फर्मेंटेशनवर आधारित जैविक रंग, पर्यायी प्रथिने, शैवालाधारित उत्पादने तसेच कृषी कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती यांसारख्या क्षेत्रांत मोठी क्षमता आहे. ऑस्ट्रेलियन कंपन्यांनी महाराष्ट्रात प्रायोगिक प्रकल्प राबवावेत, उत्पादन सुरू करावे आणि त्याचा विस्तार करावा. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कंपन्या आणि संशोधकांना ऑस्ट्रेलियातील बाजारपेठा, तंत्रज्ञान आणि भागीदारीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
प्रस्तावित टास्क फोर्सच्या माध्यमातून संयुक्त प्रकल्पांची निवड, नियामक समन्वय आणि उभय दिशेने होणाऱ्या गुंतवणुकीला गती देण्यात येईल. ऑस्ट्रेलिया आणि भारतातील अन्न व जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील नियामक तसेच संशोधन संस्थांमध्ये अधिक दृढ सहकार्य निर्माण करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. महाराष्ट्रातील केवळ ऑस्ट्रेलियन गुंतवणूक नव्हे, तर तंत्रज्ञान, व्यापार, संशोधन आणि गुंतवणुकीची द्विपक्षीय भागीदारी विकसित करणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
No comments:
Post a Comment