महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येत आहे. तसेच पोषण माहच्या माध्यमातून शहरासह राज्यातील पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. अनाथ बालकांसाठी बालकाश्रम, काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे, तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना गुणवत्तेच्या आधारे मुंबई व उपनगरातील वसतिगृहांमध्ये प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे. महिला व बालकांच्या सुरक्षेसह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment