Monday, 7 September 2026

काम करणाऱ्याला संधी’चा स्पष्ट संदेश

 काम करणाऱ्याला संधीचा स्पष्ट संदेश

 

सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हास्तरीय यंत्रणेचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निर्णय क्षमतेचा थेट परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेवर होतो. त्यामुळे उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची योग्य दखल आणि त्यानुसार पुढील संधी मिळावी, हा या निर्णयाचा केंद्रबिंदू आहे. या प्रक्रियेमुळे अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन आरोग्य संस्थांचा दर्जा सुधारण्याबरोबरच रुग्णसेवा, योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास चालना मिळणार आहे. नियुक्त्या आणि जबाबदाऱ्यांच्या वाटपात गुणवत्ता व पारदर्शकतेला अधिक महत्त्व मिळणार असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजातही सकारात्मक बदल अपेक्षित आहे.

 

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना केंद्रस्थानी ठेवून प्रशासकीय सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. या प्रक्रियेला प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या प्रशासकीय अनुभवाची साथ मिळणार आहे. तीन वर्षांची कामगिरी, 100 गुणांचे मूल्यांकन आणि स्पष्ट श्रेणीकरण यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करता येणार आहे.

 

कामगिरीला मान्यता आणि गुणवत्तेला संधीया सूत्रावर आधारित व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागातील कार्यपद्धतीला नवी दिशा देणारी ठरणार आहे. कामगिरीआधारित प्रशासकीय कार्यसंस्कृतीमुळे अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास, आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यास आणि लोकाभिमुख आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे साकारण्यास महत्त्वपूर्ण योगदान मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi