Wednesday, 26 August 2026

तपासणी-निदान-उपचार-पुनर्तपासणीवर भर (Four T Strategy)

 तपासणी-निदान-उपचार-पुनर्तपासणीवर भर (Four T Strategy)

गरोदरपणातील तीव्र रक्तक्षयामुळे माता आणि गर्भाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या समस्येचे वेळीच निदान करून उपचार देणे, उच्च जोखमीच्या मातांचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि उपचारानंतर पुनर्तपासणी करणे यावर राज्य शासनाने विशेष भर दिला आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी-निदान-उपचार-पुनर्तपासणीही साखळी अधिक परिणामकारक करण्यासाठी (Four T Strategy Test, Talk, Treat, Track ) नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अॅनिमिया मुक्त भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन २०१८-१९ पासून प्राथमिक आरोग्य केंद्रे व त्यावरील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांना आयर्न सुक्रोज इंजेक्शनद्वारे उपचार देण्यात येत होते. सन २०२४-२५ पासून राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोजसोबत, अधिक प्रभावी असलेले इंजेक्‍शन फेरीक कार्बोक्सी माल्टोजही उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे उपचारांचे पर्याय वाढले असून पात्र मातांना गरजेनुसार जलद व प्रभावी सेवा देणे शक्य झाले आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi