Wednesday, 26 August 2026

महानगरपालिका क्षेत्रांमध्ये पात्र मातांपर्यंत उपचार वेळेत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पाठपुरावा

 महानगरपालिका क्षेत्रातही उपचार सेवा प्रभावीपणे पोहोचत आहे. लातूर, नाशिक, भिवंडी, कोल्‍हापूर, उल्‍हासनगर, नांदेड-वाघाळा, नवी मुंबई, सोलापूर, चंद्रपूर, परभणी व सांगली-मिरज कुपवाड  या क्षेत्रांमध्ये उपचारांचे प्रमाण १०० टक्‍के आहे. इतर सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये पात्र मातांपर्यंत उपचार वेळेत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पाठपुरावा करण्यात येत आहे. उपचारांचे प्रमाण तुलनेने कमी असलेल्या नंदुरबार, सोलापूर, गडचिरोली, पालघर, नाशिक आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या भागांमध्ये जिल्हानिहाय उद्दिष्टे निश्चित करून आशासेविका, आरोग्यसेविका, वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत उपचार कव्हरेज वाढविण्यावर भर दिला जात आहे. शिवाय सार्वजनिक आरोग्य विभागाने तीव्र रक्तक्षय असलेल्या सर्व गर्भवती महिलांना त्यांच्या हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आयर्न सुक्रोज/फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शन देण्यासाठी जानेवारी 2026  ते मार्च 2026 अखेर विशेष मोहीम राबविली आहे. गरोदर मातांवर रक्तक्षयाचे उपचार नेहमी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच करावी लागतात.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi