Wednesday, 26 August 2026

गर्भधारणेची नोंद होताच प्रत्येक महिलेची हिमोग्लोबिन तपासणी, आयर्न-फॉलिक अॅसिडच्या नियमित आयर्न सुक्रोजचे / फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे फायदे

 गर्भधारणेची नोंद होताच प्रत्येक महिलेची हिमोग्लोबिन तपासणी, आयर्न-फॉलिक अॅसिडच्या नियमित सेवनाबाबत समुपदेशन, पोषक व लोहयुक्त आहाराची माहिती आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. एचएमआयएस अहवालाच्‍या माध्यमातून जिल्हा व तालुकानिहाय तपासणी, निदान आणि उपचाराच्या प्रगतीचे नियमित विश्लेषण केले जात आहे.

 

आयर्न सुक्रोजचे / फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे फायदे

 

Ø  रक्‍तातील हिमोग्लोबिन आणि शरीरातील लोहाचा साठा वेगाने वाढवण्यास मदत होते.

Ø  रक्‍तातील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारल्याने ऊर्जा मिळते. मरगळ व थकवा कमी होतो.

Ø  तोंडाव्‍दारे देण्‍यात आलेल्‍या आयर्न (लोहयुक्‍त) गोळ्यांमुळे होणारा मळमळ किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास या इंजेक्शनमुळे टाळता येतो.

Ø  गर्भधारणा व किडनीच्या आजारात याचा उपयोग चांगला होत आहे. तीव्र अशक्तपणा किंवा दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराच्या (CKD)RELATED समस्या असलेल्या महिलांवर उपचारासाठी आयर्न सुक्रोज फायदेशीर आहे.

Ø  या उपचार पद्धतीमुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढवून अकाली प्रसूती, प्रसूती दरम्‍यान/नंतर रक्तस्त्राव, माता मृत्यू यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi