Sunday, 23 August 2026

महाराष्ट्र–हॅसेन राज्याने व्यवसाय, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील सहकार्य वाढवावे

 महाराष्ट्र–हॅसेन राज्याने व्यवसाय, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील सहकार्य वाढवावे


- राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई ,दि.२१ : महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हॅसेन राज्यांनी आर्थिक, तांत्रिक आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्य वाढवावे असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. तसेच मुंबई-फ्रँकफर्ट आणि

महाराष्ट्र-हॅसेन यांच्यातील सहकार्यामुळे उद्योग, गुंतवणूक, संशोधन आणि जागतिक व्यापाराच्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

पारटेक्स एआयच्या वतीने मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे आयोजित ‘महाराष्ट्र-हॅसेन आर्थिक व तंत्रज्ञान संवाद’ कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. हॅसेन राज्याचे मंत्री-अध्यक्ष (मुख्यमंत्री) बोरीस ऱ्हेइन यावेळी उपस्थित होते.   

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, फ्रँकफर्ट हे हॅसेन मधील मोठे शहर जर्मनीचे आर्थिक केंद्र तसेच युरोपमधील प्रमुख वित्तीय केंद्रांपैकी एक आहे. त्याचप्रमाणे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून देशातील प्रमुख बँका, भांडवली बाजार, कॉर्पोरेट मुख्यालये आणि गुंतवणूकदारांचे केंद्र येथे आहे. त्यामुळे फ्रँकफर्टला मुंबईशी आणि हॅसेनला महाराष्ट्राशी जोडणे उभयपक्षी लाभाचे ठरेल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही भारतातील सर्वांत मोठी राज्य अर्थव्यवस्था असून महाराष्ट्राचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे १३.५ टक्के, औद्योगिक उत्पादनात १५.५ टक्के, तर देशाच्या निर्यातीत सुमारे १५ टक्के वाटा आहे. २००० ते २०२५ या कालावधीत भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी सुमारे ३१ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली असल्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी जर्मन शिष्टमंडळाला सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi