‘सीएसआर’मधून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या देखभाल आणि दुरुस्तीवर विशेष भर देण्यात यावा. अनेकदा प्रकल्प उभारल्यानंतर त्याच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने काही वर्षांनी ते प्रकल्प निष्क्रिय होतात. ही स्थिती टाळण्यासाठी प्रस्तावित सीएसआर प्राधिकरणामार्फत जुन्या प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
परदेशातील तसेच राज्याबाहेरील महाराष्ट्राशी संबंधित नागरिकांच्या सहभागातून सीएसआर व सामाजिक विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘डायस्पोरा कनेक्ट’ संकल्पनेचाही अभ्यास करण्याचीही सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
या प्राधिकरणाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतील तर गव्हर्निंग कौन्सिलमध्ये वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असेल. मुख्य कार्यकारी अधिकारी हे या गव्हर्निंग कौन्सिलचा सदस्य-सचिव तसेच कार्यकारी कौन्सिलचा प्रमुख असेल.
0000
संजय ओरके/विसंअ
No comments:
Post a Comment