UPI क्रांतीचे हॅसेनच्या मंत्री-अध्यक्षांकडून कौतुक
हॅसेनचे मंत्री-अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांनी भारतातील यूपीआय व्यवहारांच्या क्रांतीचे कौतुक केले. हॅसेनमध्ये सुमारे ४० हजार भारतीय नागरिकांचा समुदाय असून, हा समुदाय हॅसेनच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
पारटेक्स एआयचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सहसंस्थापक गौरव त्रिपाठी यांनी हॅसेनमध्ये काम करण्याच्या आपल्या अनुभवांची माहिती दिली.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि हॅसेनचे मंत्री-अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला भेट देऊन तेथील कार्यपद्धतीची माहिती घेतली.
No comments:
Post a Comment